Aarambh Magazine – call for articles

नमस्कार मंडळी!

आपला गणेशोत्सव अगदी दिमाखात पार पडला. आता तर नवरात्र, दसरा, दिवाळी अशी सणांची रांगच लागते. आणि हे सगळे सण मोठ्या जल्लोषात साजरे करण्याची आपली परंपरा आहे. दिवाळी म्हणजे तर सगळ्यात मोठा सण. चमचमीत फराळाचे पदार्थ, झगमगीत रोषणाई, नवनवीन कपडे, घराची छान सजावट, मातीचा किल्ला, त्यावरची चित्रं आणि परिवार व मित्रांबरोबर घालवायचे आनंदाचे खास क्षण म्हणजे दिवाळी. या सगळ्यांबरोबरच दिवाळी म्हटलं की मराठी माणसाला आठवतो तो ‘दिवाळी अंक’.

आपल्या आरंभ मासिकाचा पुढचा अंक सुद्धा दिवाळीच्या आसपासच प्रसिद्ध होईल. आणि म्हणूनच त्यामध्ये आपल्या दिवाळीच्या आठवणी कथा, कविता, चित्र किंवा आपल्याला आवडतील त्या स्वरूपात आमच्याकडे पाठवा. आम्ही ते अंकात नक्की समाविष्ट करू.

अर्थातच आपल्याला इतर विषयाबद्दल माहिती द्यायची असेल तर तीही पाठवा, अंकाला कुठल्याही विषयाचे बंधन नाही.

आरंभ मासिकाच्या मागील अंकांना जसा भरघोस प्रतिसाद मिळाला तसाच आताही मिळेल हीच अपेक्षा.

आपले सर्व साहित्य ३० ऑक्टोबर पर्यंत umm@utahmarathi.com या ई-मेल वर पाठवा.

धन्यवाद

आरंभ संपादक मंडळ

Hello

We had a grand celebration for our Ganesh festival. And now everybody must be eagerly waiting for Navratri, Dasara and Diwali. Diwali is our biggest festival. We always celebrate it with lot of enthusiasm and happiness. We, Marathi people have lot of special traditions for Diwali like ‘Diwali Faral’, ‘Killa’ etc and along with those, another Diwali special Marathi tradition is ‘Diwali magazine’.

Our next Aarambh issue will be published around Diwali time. If you have any Diwali memory to share, please send it to us a story, poem, painting or any other form you like.

Also if you want to share material on any other subject, we will be happy to publish it in the magazine. There is no restriction on any subject.

We will be waiting for your contribution. Please send your material to umm@utahmarathi.com by 30th October.

Thank you

Aarambh’s Publication Team

You may also like...

Leave a Reply

Utah Marathi Mandal