तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

जेंव्हा आपल्या मना मध्ये गोडवा असतो, तेव्हा तो आपल्या नात्यांमध्ये आपसूकच उतरतो. आणि मग त्यातून अतिशय गोड असं एक नातं निर्माण होतं, मैत्रीचं! असंच घट्ट मैत्रीचं नातं आपण नेहमी अनुभवतो ते आपल्या युटा मराठी मंडळात. मागल्या वर्षी एकत्र अनुभवलेले अनेक गोड क्षण आपल्या आठवणीत आहेतंच. संक्रांत हा २०१८ चा पहिला सण. त्यानिमित्ताने युटा मराठी मंडळाच्या प्रत्येक सदस्याला मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा.

येत्या २० तारखेला आपण भेटणार आहोतच, खूप गप्पा मारायच्यात, धमाल करायची आहे आणि एक मेकांना तिळगुळ देऊन म्हणायचंय
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला !!!

You may also like...

Leave a Reply

Utah Marathi Mandal