Utah Marathi Mandal Magazine Issue 1
First UMM Magazine Issue: http://utahmarathi.com/wp-content/uploads/2018/03/Aarambh_Vol1_March2018.pdf
अनुक्रमणिका
Aarambh_Vol1_March2018_1_indexसंपादकीय
Aarambh_Vol1_March2018_2_sampadakiyयु म मं अध्यक्षांचे मनोगत
शीर्षक आणि मुखपृष्ठ – माहिती
Aarambh_Vol1_March2018_3_presidentaddressललितलेखन
युटा, मराठी आणि मंडळ – अर्चना यादव
Aarambh_Vol1_March2018_4_archanaमराठी नुतन वर्ष: गुढीपाडवा’ – तपस्या भार्गवे
Aarambh_Vol1_March2018_5_gudipadwaआईस पत्र – अमित श्रीगोंदेकर
Aarambh_Vol1_March2018_6_lettertoaaiबंड्या बोपर्डीकर: व्यक्तिचित्र – श्रीवास अष्टपुत्रे
Aarambh_Vol1_March2018_7_bandyaनक्षत्रांचे देणे: कविवर्य मंगेश पाडगांवकर – श्रीकांत अग्निहोत्री
Aarambh_Vol1_March2018_8_padgavkarआरोग्य
East comes west – संतोष माकणीकर
Aarambh_Vol1_March2018_9_yogaआयुर्वेद काय सांगते- अंजली कुलकर्णी
Aarambh_Vol1_March2018_10_aayurvedHealthy Burger Recipe – प्रिती माकणीकर
Aarambh_Vol1_March2018_11_recepieकविमन
आम्हाला काय येते – मेघा शिवेकर
बघ जरा वाचून – अभिज्ञा पाठारकर
A journey on the spiritual path – अभिज्ञा पाठारकर
जिंदगी का पथ – मिलिंद झोडगे
Aarambh_Vol1_March2018_12_poemsबालविश्व
Einstein Painting – Sidhant Patwardhan
Fairy (painting) – Trisha Patwardhan
Sharpie drawings – Shravya Harnekar
Aarambh_Vol1_March2018_13_paintingsPaintings – Anjali Sutar
Paintings – Ishika Sutar
Short writeup about UMM – Ishika Sutar
Aarambh_Vol1_March2018_14_paintingsगणितातील गमती जमती- आकाश कुलकर्णी
Aarambh_Vol1_March2018_15_puzzleओळखा पाहू – ओजस कुलकर्णी
Aarambh_Vol1_March2018_16_puzzle
सर्व प्रथम सर्व युटा मधल्या मराठी बांधवांचे , भगिनींचे अभिनंदन, आणि बाळगाेपाळांचे अभिष्ठ चिंतन,.आपल्या उपक्रमाचे काैतुक करावे तितके कमीच! तुमच्या स्नेह आणि आदरातिथ्याचा आनंद घेतानाच ,मी तुम्हा सर्वांचे मैत्रीपुर्ण संबध Salt Lake मधील (2014) भेटीत क्रीकेट टीम, मॅचेस , शिवेकर यांच्या घरचे आग्रह पूर्ण रात्रीचे भाेजन यातुन अनुभवला! आज ” आरंभ”च्या माध्यमातून तमचे स्नेहसंबंध आणखी दृढ हाेतील , तसेच तुमच्या आणि तुमच्या कलागुणांना आणखी एक मंच उपलब्ध झाला आहे़ “आरंभ” मधे पहील्याच पदार्पणात हीरहीरीने भागघेणार्या सर्वाना शुभेच्छा आणि अभिनंदन सर्वांचे लेख अभिनंदनीय सर्व लहान , बाल कलाकारांची चित्रे अतिशय छान! कविताही छानच़ UMM च्या सर्व सभासदांना , कलाकारांना, खेळाडुंना , आणि इतर सर्वांना माझ्या लक्ष लक्ष शभेच्छा!! आपला पुणे येथील स्नेही— श्रीकांत अग्निहाेत्री
dhanywad Shrikant ji.
आरंभ…….! काय लिहू आणि किती लिहू तेच कळत नाहीय. ‘आरंभाने’ माझ्या युटाह मराठी मंडळातील माणसांशी सुरू झालेल्या ‘ऋणानुबंधाचा’ आरंभ केला एवढं मात्र नक्की! एक एक शब्द न शब्द वाचून काढला आरंभचा. खूपच स्तुत्यमय आहेत सर्व लेख, कविता आणि इतर कलाकारी. अतिशय प्रतिभावंत कलाकार आहेत मंडळात हे जाणून खूपच अभिमान वाटला. मराठी लेखनासाठी मराठी वाड:मयात पदवीधर असायचीच गरज असते असे नाही, त्यासाठी जन्मजात मराठी भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी असणारी ओढ, अलौकिक प्रतिभा, निर्मळ मन आणि लिहिण्याची आवड एवढेच हवे असते, हे सिद्ध करुन दिले या लेखकांनी.
मुखपृष्ठापासून ते शेवटचे पान-बालविश्वापर्यंतचा माझा वाचनाचा प्रवास अवर्णनिय असा होता. संपादकांनी लिहिलेली प्रस्तावना, शीर्षक आणि मुखपृष्ठासाठी सौ. भवाळकर आणि श्री हेमंत गोरे यांनी उचललेला मोलाचा वाटा, अध्यक्ष अर्चना यांचे मनोगत, तसेच त्यांचे अमेरिकेतील य़ुटाह प्रदेशातील सुरुवातीचे वर्णनीय अनुभव, अमीत श्रीगोंदेकर यांची ‘आई’…..कोण म्हणतं की केवळ साने गुरुजींची ‘श्यामची आईच’ श्रेष्ठ… नव्हे नव्हे ‘आई’ हा शब्दच एवढा गहन आहे की मला येथे ‘अमीतची आई’ पण खूप संस्कार बिंबविणारी आणि प्रेमळ अशी उमगली. श्रीवासनी रेखाटलेले बंड्या बोपर्डीकर यांचे अतिशय जीवंत व्यक्तिमत्व……अप्रतिम लेखनशैली. माननीय श्रीकांत अग्निहोत्री यांनी कविवर्य मंगेश पाडगांवकरांवर केलेला सखोल अभ्यास आणि त्यांच्याविषयी असलेले निस्सीम प्रेम आणि आदर, संतोष माकणीकरांची आणि अंजली कुलकर्णी यांची सुदृढ आरोग्याबद्दल असलेली तळमळ, आयुर्वेदाचे उत्तम धडे देणा-या अंजली कुलकर्णी, प्रीती माकणीकर यांची पौष्टीक पाककृती, मेघा शिवेकरांनी त्यांच्या कवितेत रंगविलेली एकाच वेळी दुहेरी भुमिका निभावणारी कौटुंबिक-आधुनिक पण एक क्रांतिकारक स्त्री, भावनाशील-अंतर्मुख-गहन मनोवृत्तीची अध्यात्मिक अशी अभिज्ञा, जीवनाचा प्रवास सकारात्मक करण्यास प्रोत्साहन देणारे मिंलिंद यांचे कविमन, अंजली सुतारांची सुंदर चित्रकला आणि अनेकविध कलांनी व्यापलेले शेवटच्या दोन पानांचे प्रतिभावंत बालकलाकारांचे बालविश्व.
मासिकाचा प्रथम अंक; एवढा प्रतिभाशाली! कविमनाला, लेखकाला आणि इतर अनेक कलागुणांना उत्स्फुर्तपणे व्यक्त होण्यासाठी लाभलेला हा अदृश्य मंच……आरंभ!
अहंकाराचा एक लवलेशही नसलेली निर्हंकारी माणसे मला ह्या मंडळात कार्यरत असलेली पहावयास मिळाली. केवढे ते आदरतिथ्य…..! अजूनही मी सर्वांनाच ओळखत नाही, तरीही जेवढ्या ओळखी झाल्या त्या व्यक्तिंमधील माणूसकीला ओळखल्यावर मला असं नक्कीच वाट्टे की ओळखीपलिकडील व्यक्तीदेखील अशाच सालस आणि निर्हंकारी असतीलच. मनापासून खूप खूप आभार सर्व मंडळींना!
धन्यवाद,
तपस्या
Dhanywad Mrs. Tapasya