Thank you for making a memorable Gudhi Padwa & Shiv Jayanti 2018

नमस्कार
गुढी पाडवा आणि शिवजयंती चा सोहळा युटा मराठी मंडळातील सर्व सभासदांसाठी खूपच विलक्षण होता. नवीन वर्षाचं स्वागत सर्व परिवाराने एकत्र येऊन केलं त्यामुळेच ते इतकं छान झालं. यामध्ये मैत्री होती, नवीन उपक्रमांना दिलेला पाठिंबा होता, ज्येष्ठांनी आणि श्रेष्ठांनी दिलेले आशीर्वाद होते आणि लहानांनी त्यांच्या विविध गुणदर्शनाने दिलेला आनंद होता, मग असे क्षण खास तर होणारच.

कार्यक्रम यशस्वी करण्यामागे अनेक जणांचे कष्ट होते, अनेक स्वयंसेवकांनी यासाठी खूप मदत केली, सजावट करताना, जेवण वाढताना, कार्यक्रम चालू असताना, फोटोग्राफी करताना आणि नंतर सगळ्या गोष्टी आवरताना अनेक जणांची खूप मदत झाली त्या सर्वांचे मनापासून आभार.

या कार्यक्रमात ज्या कलाकारांनी आपली कला सादर केली, त्यांचे गुरु आणि पालक या सर्वांचे विशेष आभार. त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच कार्यक्रमाला खरी शोभा आली. काल सादर झालेला एक न एक कर्यक्रम उत्कृष्ठच होता.

जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य पथकाच्या उत्कृष्ठ ढोल-ताशा वादनाने झाली, तेव्हाच हा कार्यक्रम यशस्वी होणार हे निश्चित झाले होते, धन्यवाद स्वराज्य ढोल पथक.

या नवीन वर्षांमध्ये आपली मैत्री, आपल्यातले कलागुण आणि आपला युटा मराठी परिवार असाच वृद्धिंगत होवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.

 

Gudhi Padwa and Shiv Jayanti celebrations were truly memorable for all the members because we were all together. There were friendships, support, and encouragement for new initiatives, blessings from all the seniors and joy of watching amazing performances from our young members.

A lot of people helped to make this program a great success. Many volunteers were working tirelessly for decorations, food serving, helping during performances, photography, and cleaning. A big thank you to all the volunteers.

Special thanks to all the performers, choreographers and their parents for their hard work and dedication. Each and every performance was amazing.

Whenever we see our ‘Swarajya Dhol Pathak’ playing their amazing routine, its a treat to watch. Thank you ‘Swarajya’ for yet another awesome performance.

We pray to Ganpati Bappa that this new year strengthens our friendship further and gives us lot of opportunities to showcase and increase the talent amongst us.

धन्यवाद

युटा मराठी मंडळ

Event Highlights

Watch on Youtube: https://www.youtube.com/playlist?list=PLweahLI_FneWk23fKORbibBW2uCh50h4H

Event Photos

Coming soon….

You may also like...

Leave a Reply

Utah Marathi Mandal