Ganesh Utsav 2019 Highlights

Thank You

THANK YOU

(english version of the message is below Marathi text)
नमस्कार,
गेल्या शनिवारी म्हणजेच ७ तारखेला आपल्या मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षी प्रमाणेच गणपती बाप्पाची मिरवणूक स्वराज्य ढोल पथकाच्या उत्साहवर्धक आणि पारंपरिक वादनाच्या साथीत निघाली. पथकाने या वर्षी महिला वादकांना सहभागी करून जे नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला तो खरोखरीच कौतुकास्पद आहे. स्वराज्य ढोल पथकाचे आभार.
या वर्षी प्रसाद म्हणून बाप्पाच्या आवडीचे मोदक होते. जास्वंदी सकपाळ यांनी हा प्रसाद उपलब्ध केला होता त्याबद्दल त्यांचे आभार. गणपतीची अतिशय सुंदर आरास केली होती सोनाली आणि मिहीर गोडबोले यांनी, त्यांचे आभार.
कार्यक्रमात उत्साह आला तो सर्व कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे. सर्व कलाकार आणि त्यांच्या गुरूंचे आभार. कार्यक्रमाचे सूत्र संचालन फारच उत्कृष्ठ पद्धतीने केल्याबद्दल शुभदा पवार आणि मोनल श्रीगोंदेकर यांचे आभार.
मंडळाचा कोणताही कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यामागचं एकमेव कारण म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची मदत. आपण सर्वजण उत्साहाने आणि हिरीरीने नेहमीच मदत करत असता. आदल्या दिवशी स्टेज तयार करणे असेल, खुर्च्या मांडणे असेल, जेवण वाढणे असेल किंवा अगदी कार्यक्रमानंतरची स्वछता असेल, सर्व कामांमध्ये कार्यकर्त्यांची मदत खूपच महत्वाची असते. सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार.
मंडळाच्या सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार.
पुढच्या कार्यक्रमात भेट होईलच. धन्यवाद.

Hello
We celebrated UMM’s Ganesh Festival on last Saturday that is on 7th September. Like every year we welcomed Lord Ganesha by taking out a grand procession. Swarajya Dhol Pathak’s traditional but exciting performance kept the energy level very high during the procession. A special thing about this year was the participation of female members in Swarajya Pathak. Thank you very much Swarajya Dhol Pathak.
‘Modak’ which is favorite sweet to Ganapati bappa was this year’s ‘prasad’. It was provided by Jaswandi Sakpal. A special thank you to Jaswandi.
This year’s amazing and beautiful decoration was the creation of Sonali and Mihir Godbole. Thank you to them.
A big thank you to all the performers and choreographers. All the performances were amazing. Thank you Shubhada Pawar and Monal Shrigondekar for managing the event with perfect anchoring.
No event is possible without help from all volunteers. Its your hard work and dedication that is behind all successful events so far. A big thank you to all our volunteers.
UMM would like to thank all our donors for their help.
We will meet at our next event.

Photos

 
Google Photos Refresh Token invalid. Please authenticate from Photonic → Authentication.
Error encountered during authentication:
{
  "error": "invalid_grant",
  "error_description": "Bad Request"
}
See here for documentation.

Performances

 

 

You may also like...

Leave a Reply

Utah Marathi Mandal